कोटगाव( आदर्श) हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील असून जिल्हा मुख्यालयापासुन ११० कि.मी..अंतरावर वसलेले आहे. कोटगाव (आदर्श) हे गाव नागभीड – नागपूर राज्य मार्ग क्र. रोडवरील बाम्हणी या गावापासून पूर्वेस ३ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. गावामध्ये दळणवळणाच्या सोयीच्या दृष्टीने नागभीड-नागपूर लोहमार्गावर कोटगाव येथे थांबा आहे. गावामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत असून गावाची लोकसंख्या १२०५ एवढी आहे. कोटगाव (आदर्श) या गावाला आदर्श पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार,स्वच्छ भारत पुरस्कार प्राप्त झालेले आहे. या गावामध्ये इतर मागसवर्गीय, अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, भटक्या विमुक्त जाती इत्यादी जातीचे लोक गुणा- गोविंदाने राहतात. गावामध्ये शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने १९४६ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्थापन झाली असून आजतागायत कार्यान्वित आहे. तसेच गावातील विद्यार्थी, विद्यार्थिनी चे माध्यमिक व हायस्कूल पर्यंतच्या शिक्षणाची सोयी करिता सन १९६१ ला कृषक विद्यालय कोटगाव ची स्थापना करण्यात आली. गावा शेजारील गरीब विद्यार्थ्यांच्या राहण्याकरिता गावामध्ये वसतिगृह आहे. मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या करिता गावामध्ये लोकनेते बाबूरावजी भेंडारकर सार्वजनिक वाचनालय उपलब्ध आहे. तसेच लहान मुलांच्या व माताच्या विकासाकरिता गावामध्ये २ (दोन) अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. गावातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्याकरिता प्रसुतीगृहाची सुविधा उपकेंद्रामध्ये उपलब्ध आहे. महिलांच्या सशक्त सबलीकरणाकरिता गावामध्ये १६ महिला बचत गट व त्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता ग्रामसंघ कार्यान्वित आहे. कोटगाव (आदर्श) या गावाचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतकरी सगळ्यात जास्त पिक हे भातशेती, भाजीपाला चे लागवड करतात. गावामध्ये बहुतांश शेतकऱ्याकडे विद्युत पंप, बोर ची व्यवस्था असल्यामुळे उन्हाळी भातपिकाची तसेच गहू, हरभरा, लाखोरी, वटाणा, मुग, उडीद या कडधान्याची लागवड करतात. ग्रामपंचायत कोटगाव येथे गावाच्या विकासासाठी महात्मा गांधी तंटामुक्तगाव समिती, ग्रामस्वच्छता समिती, वन व्यवस्थापन समिती (JFM), इको विकास समिती (EDC) व जैवविविधता समिती (BMC) स्थापित आहे. गावामध्ये स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणासह इतर सन व थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. गावात एक गाव एक गणपती या संकल्पेप्रमाणे एक गणपती, एक शारदा, पोळा, तान्हापोला हे उत्सव साजरे केले जाते. गावामध्ये मुलांच्या सुसंस्कार घडविण्याकरिता गुरुदेव सेवामंडळ मार्फत दररोज सामुदायिक पार्थना, ध्यान तसेच बौद्ध्मंदीर मध्ये दररोज बुद्धवंदना केली जाते.