ग्रामपंचायत कोटगाव

तालुका: नागभीड | जिल्हा: चंद्रपूर

उपलब्ध लोकसेवा

सेवा हक्क अधिनियम अंतर्गत ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती व अर्ज प्रक्रिया

जन्म नोंदणी व प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाल्यास २१ दिवसांच्या आत नोंदणी करून प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
  • आई-वडील यांचे आधारकार्ड
  • आशा/अंगणवाडी अहवाल
  • रुग्णालय कागदपत्रे
प्रक्रिया:
खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.
शुल्क:
पहिले प्रमाणपत्र मोफत, नंतर ₹20
वेळ:
7 दिवस
मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
  • मयत व्यक्तीचे आधारकार्ड
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय/पोलीस स्टेशन कागदपत्रे
प्रक्रिया:
मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.
शुल्क:
पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये
वेळ:
7 दिवस
विवाह नोंदणी व प्रमाणपत्र

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.

आवश्यक कागदपत्रे:

  • विवाहाचे ज्ञापन
  • वर-वधूचे जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार/मतदार कार्ड/ड्रायविंग लायसन्स
  • रेशन कार्ड/वीजबिल/पासपोर्ट
  • लग्नपत्रिका
  • शपथपत्र
  • लग्नाचे फोटोग्राफ्स
  • पासपोर्ट फोटो (2)
  • तीन साक्षीदार फोटो (2)
  • घटस्फोट आदेश प्रत
  • पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र
प्रक्रिया:
प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची छाननी केली जाते. खात्री झाल्यावर विवाह नोंदणी केली जाते.
शुल्क:
विवाह नोंदणी 50 ते 200 रुपये, प्रमाणपत्र 20 रुपये
वेळ:
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

दारिद्र्य रेषेखालील असलेल्या यादीत नाव असल्यास दाखला दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
प्रक्रिया:
यादीत नाव तपासून दाखला दिला जातो.
शुल्क:
20 रुपये
वेळ:
7 दिवस
नमुना नं 8 चा उतारा

नमुना नंबर 8 मधील स्वमालकीच्या मालमत्तेचा उतारा दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
प्रक्रिया:
नमुना नं 8 रजिस्टरवरून नाव तपासून उतारा दिला जातो.
शुल्क:
20 रुपये
वेळ:
5 दिवस
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत करांची येणे बाकी नसल्यास प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
प्रक्रिया:
नमुना नं 9 रजिस्टरवरून नाव तपासून प्रमाणपत्र दिले जाते.
शुल्क:
20 रुपये
वेळ:
निराधार असल्याचा दाखला

कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंब प्रमुख नसल्याचा दाखला दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्ज
  • कुटुंब प्रमुख मृत्यू प्रमाणपत्र
प्रक्रिया:
चौकशी व खात्री करून प्रमाणपत्र दिले जाते.
शुल्क:
निःशुल्क
वेळ:
20 दिवस